bdobhandara@gmail.com
Skip to main content | |
ताजी बातमी
भंडारा पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. शासकीय योजना व माहिती करिता विभाग मेनूला भेट द्या. तक्रार नोंदणीसाठी "आपले सरकार" प्रणालीचा वापर करा. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा.

पर्यटन स्थळे

भंडारा तालुक्यातील प्रसिद्ध दर्शनीय स्थळे

रावणवाडी
मंदिर व जलाशय

रावणवाडी

रावणवाडी हे स्थळ भंडारा तालुक्यात मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी सुमारे १०० वर्षांपासून मौजा रावणवाडी येथील पहाडीवर श्री राम मंदीर आहे. मंदिराच्या दक्षिणेस हनुमान मंदीर आणि पश्चिमेस अंबामाईचे मंदीर आहे. पायथ्याशी रावणवाडी जलाशय आहे ज्यात वर्षभर पाणी असते. कार्तिक एकादशी अमावास्येला यात्रा भरते.

कोरंभी देवी
देवीचे मंदीर

कोरंभी देवी

मौजा कोरंभी हे गाव भंडारा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर आहे. कोरंभी गावाच्या उत्तरेस वैनगंगा नदीच्या तीरावर पहाडीवर अंबादेवीचे मंदीर आहे. मंदीर सपाटीपासून ५०० फुट उंचावर आहे. नवरात्र, चैत्र पौर्णिमा व मकरसंक्रांतीला यात्रा भरते.

बौद्ध तीर्थक्षेत्र

सिंधपुरी बुद्ध विहार

सिंधपुरी हे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. भंडारा जिल्ह्यापासून फक्त ३ कि.मी. अंतरावर. वर्षभर यात्रेकरू येतात. स्थानिक लोक या स्थळाला महासमाधी बोधी असेही म्हणतात.

झरा व महादेव मंदीर

नांदोरा झिरी

नांदोरा गावाजवळ भंडारा मुख्यालयापासून १३ कि.मी. अंतरावर पश्चिमेला झिरी पर्यटन स्थळ आहे. पहाडीवर ३०० फुट उंचीवर हे स्थळ असून पहाडीवरून पाण्याचा झरा वाहत असतो. महादेवाचे मंदीर असून महाशिवरात्री व मकरसंक्रांतीला यात्रा भरते.

गणेश मंदीर

भृशंड गणेश मंदीर

भंडारा मुख्यालयापासून २ कि.मी. अंतरावर हे प्राचीन गणेश मंदीर आहे. मूर्ती अंदाजे ७५० वर्षांपूर्वीची प्रतिष्ठापित आहे. दर चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.

महत्वाची संकेतस्थळे